Hanuman Jayanti 2022 | घरबसल्या घ्या सप्तश्रृंगीचं दर्शन, गडावर अलोट गर्दी | Sakal

2022-04-16 27

साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवानिमित्ताने देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळलीय. शेकडो मैलांचा प्रवास, त्यात तळपणारा उन, शरीराची लाहीलाही होत असतांनाही उरात भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन तब्बल साडेतीन लाख भाविक सप्तश्रृंगी देवी चरणी नतमस्तक झाले. तर चैत्रोत्सवानिमित्ताने लाखो भाविकांच्या उपस्थितीत देवीच्या कीर्ती ध्वजाची विधिवत पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. मध्यरात्री हा कीर्ती ध्वज सप्तश्रृंगी गडाच्या शिखरावर फडकवण्यात आला.

#HanumanJayanti2022 #Saptashrungi #Nashik #Sakal #ChaitraNavratra #HanumanJayanti #SaptashrungiTemple

Videos similaires